गोंदिया,दि.०२ः तालुक्यातील नंगपुरा मुर्री येथील ७ ग्रामपंचायत सदस्यांनी कर भरणा नोटीस मिळाल्याच्या (९० दिवस) निर्धारीत वेळेत घरटॅक्स व इतर टॅक्सचा भरणा ग्रामपंचायत कार्यालयात न केल्याचे सिध्द झाल्याने जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी आज २ जुर्ले रोजी त्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.सदर सदस्याविरुध्द सरपंच कविता माधवराव लिचडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.त्या तक्रारीच्या अनुषंगाने झालेल्या चौकशीनंतर सदर आदेश पारीत करण्यात आलेला आहे.ज्या ७ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले,त्यामध्ये राजकुमार कैलाश टेकाम,रणदीर मदन शहारे,रवि मुकेश बोमचेर,लीना उमेश पारधी,इंद्रकला ओमप्रकाश पारधी,मंदा दुर्गेश भिवगडे,,राजेश कापसे यांचा समावेश आहे.





