24.5 C
Gondiā
Friday, July 3, 2026
Home विदर्भ निमगाव आंबेनाला प्रकल्पाचे काम सुरु करा अन्यथा उपोषणावर बसणार-आ.रहागंडाले

निमगाव आंबेनाला प्रकल्पाचे काम सुरु करा अन्यथा उपोषणावर बसणार-आ.रहागंडाले

0
15

तिरोडा :-तिरोडा गोरेगाव मतदारसंघातील तिरोडा तालुका जि. गोंदिया येथे निमगाव लघु पाटबंधारे प्रकल्पाचे बांधकाम रोहयो अंतर्गत सन १९७३ ते १९८४ पर्यंत करण्यात आले परंतु वनसरक्षण अधिनियम १९८० लागु झाल्यानंतर प्रकल्पाचे काम बंद करण्यात आले. त्यानंतर १४१.६२ हे. (सुधारित १३५.१५हे. आर) वन जमीन वळतीकरणाचा प्रस्ताव केंद्र शासनास सादर करण्यात आलेला असुन केंद्र शासनाचे पत्र दि. २४/०८/२००६ अन्वये तत्वतः मान्यता प्रदान करण्यात आली. सन २०१२-१३ मध्ये सदर क्षेत्र नवेगाव नागझिरा व्याघ्र क्षेत्र घोषित झाल्यामुळे सन २०१७ मध्य राष्ट्रीय वन्यजीव महामंडळाची मंजुरी घेण्यात आली त्यानंतर सर्व निधीचा (४५.०० कोटी) भरणा करुन अंतिम वन मान्यतेचा प्रस्ताव केंद्र शासनास सन २०२३ मध्ये सादर करण्यात आला. परंतु केंद्र शासनाने त्यांचे पत्र दिनांक १७/०५/२०२४ व तंदनंतर दिनांक ०१/१०/२०२४ अन्वये काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत. सदर प्रकल्पामुळे मतदारसंघातील ४ दलघमी पाणीसाठा निर्माण होऊन १००० हे. आर क्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ देता येऊ शकतो अशा महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम वारंवार पाठपुरावा करुनही तसेच पैस भरुनही वन वळतीकरणाकरिता जागा मिळत नसल्यामुळे सुरु झालेले नाही. सदर प्रकल्पाचे काम सुरु व्हावे याकरिता मला आमरण उपोषणावर बसण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी केली असता येत्या १५ दिवसात पर्यायी वन वळतीकरणाकरिता जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश वनमंत्री महोदयानी विभागास दिले आहेत