24.5 C
Gondiā
Friday, July 3, 2026
Home विदर्भ देवरी उपविभाग विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेत आघाडीवर

देवरी उपविभाग विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेत आघाडीवर

0
5

गोंदिया, दि. 3 जुलै 2026 : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत देवरी उपविभागात गणना पत्रकांचे वाटप व डिजिटायझेशनचे काम वेगाने सुरू आहे.शुक्रवार दुपारी 2 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, एकूण 2,70,811 मतदारांपैकी 57,914 (21.39 टक्के) मतदारांना गणना पत्रके वितरित करण्यात आली असून, 1,558 पत्रकांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे.

तालुकानिहाय प्रगतीत देवरी तालुका 38.51 टक्क्यांसह आघाडीवर आहे. सालेकसा तालुक्यात 14.61 टक्के, तर आमगाव तालुक्यात 11.66 टक्के वाटप पूर्ण झाले आहे.कामाचा वेग वाढवण्यासाठी अधिकाऱ्यांनी बोरगाव येथे क्षेत्रभेट देऊन बीएलओंसह गृहभेटी घेतल्या व कामाचा आढावा घेतला. प्रलंबित काम तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.प्रशासनाने सर्व मतदारांना गणना पत्रक अचूक भरून आवश्यक कागदपत्रांसह लवकरात लवकर संबंधित बीएलओकडे जमा करण्याचे आवाहन केले आहे.