24.5 C
Gondiā
Friday, July 3, 2026
Home गुन्हेवार्ता बोरवेलचे वायर चोरी करणार्या दोन विधिसंघर्ष आरोपीकडून 1,07,700/- रुपयांचे मुद्देमाल जप्त

बोरवेलचे वायर चोरी करणार्या दोन विधिसंघर्ष आरोपीकडून 1,07,700/- रुपयांचे मुद्देमाल जप्त

0
9

गोंदिया,दि.०३- तालुक्यातील पोलीस स्टेशन गंगाझरी अतंर्गत बोरवेलचे वायर चोरी करणार्या दोन विधिसंघर्ष मुलाकंडून सुमारे १ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करीत त्यांना गंगाझरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.सविस्तर असे की,दिनांक 02/07/2026 रोजी तक्रारदार नामे सुरेंद्र पूरणलाल टेंभरे राहणार डोंगरगाव यांनी पोलीस स्टेशन गंगाझरी येथे तक्रार दिली कि दिनांक ०१/०७/२०२६ ते ०२/०७/२०२६ रात्री दरम्यान कोणीतरी अज्ञात आरोपीतांनी त्याचा शेतात बोरवेल ला असलेली वायर अंदाजे २५० फूट किमती ७५००/- रुपयांचा चोरून नेल्याने पो.स्टे. गंगाझरी येथे अप क्रमांक 308/2026 कलम 303(2) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आला होतो व सादर गुन्हयाचा तपास पोलीस स्टेशन गंगाझरी पोलीस करीत होते.
आज दिनांक ०३/०७/२०२६ रोजी पोलीस स्टेशन येथील पोलीस पथक आरोपीतांचा शोध घेत असता गोपनीय माहिती प्रपात झाली कि सदरची चोरी संजयनगर गोंदिया येथे राहणारे दोन विधीसंघर्ष बालकांनी केली आहे. प्राप्त गोपनीय माहितीवरून गंगाझरी येथील पोलीस पथकांनी दोन विधी संघर्षीत बालक यांना ताब्यात घेवून त्यांना सदर गुन्ह्याबाबत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांचेकडून गुन्ह्यात चोरी गेलेला 1) 250 फूट बोरवेल चा वायर किमती 7500/- रुपये 2) दोन केबल कटर किंमती 200/- व गुन्हा करताना वापरलेली 3) होंडा एक्टिवा मोटर सायकल किमती 100000/- असा एकूण किंमती 1,07,700/- rs चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे

सदरची कामगीरी गोरख भामरे पोलीस अधिक्षक, गोंदिया, अभय डोंगरे अपर पोलीस अधिक्षक गोंदिया,गजानन गुल्हाने उपविभागीय पोलीस अधिकारी तिरोडा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गंगाझरी चे ठाणेदार स.पो.नि. धीरज राजूरकर , पो. उप.नि.धाराव, पोहवा भुरे, पो.हवा. देशपांडे, पो. शी. राऊत, पो. शी. नागपुरे, पो. शि. जनेवार पोस्टे गंगाझरी यांनी केली आहे