नाना पटोले यांची चौकशी समिती व मंत्रालयातील अधिकाऱ्यांना धरले धारेवर
देसाईगंज दि.९ गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज (वडसा), येथील मायाश्री ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज राईस मिलमधील सीएमआर (CMR)धान घोटाळ्याबाबत दि. १६ मार्चला सखोल चौकशी एका महिन्यात करण्याबाबत नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती शासनाने गठीत केली होती. या समितीला मुदतवाढ दिली होती.त्यानंतर किमान आधारभूत किंमत योजनेत धान खरेदीच्या नावाखाली गडचिरोलीत मोठा घोटाळा झाल्याचे समोर आल्याने आमदार नाना पटोले यांच्या तक्रारीनंतर मंत्रालयाने तत्परता दाखवत आर्थिक गुन्हे शाखा इओडब्ल्यूला दि.२० मे लगा चौकशीचे आदेश दिले होते. हा आदेश एका रात्रीतून शासनाने फिरवून आपल्याच आदेशाला स्थगिती दिली होती.
याबाबत आज विधानसभेत नाना पटोले यांनी पुन्हा मुद्दा उपस्थित करून इओडब्ल्यू कडुन चौकशी करणार का? चौकशी समितीने विहित मुदतीत चौकशी अहवाल सादर केला नाही त्या समितीतील अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? शासनाची लुट करणाय्रा मायाश्रीवर कारवाई करणार का? असा प्रश्न अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढे उपस्थित केला आहे.
राज्यातील पुर्व विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया व नागपूर या जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने दरवर्षी प्रमाणे बोनस द्यावा या मागणीला पाठिंबा देण्यासाठी विधीमंडळात चर्चेत सहभाग घेतला होता त्यावेळी ही जोरदार मागणी केली होती. मायाश्री ग्रुप ऑफ राईस इंडस्ट्रीजवर धाड टाकली तर पुर्व विदर्भातील सर्व शेतकऱ्यांना बोनस देता येईल येवढी लुट शासनाची केली आहे असे ते म्हणाले.





