26.4 C
Gondiā
Tuesday, August 25, 2026
Home राजकीय तिरोड्यात नवनिर्वाचित खासदार राजेंद्र जैन यांचा जल्लोषात भव्य स्वागत व जाहीर नागरी...

तिरोड्यात नवनिर्वाचित खासदार राजेंद्र जैन यांचा जल्लोषात भव्य स्वागत व जाहीर नागरी सत्कार

0
74

तिरोडा : स्व. अटल बिहारी वाजपेयी सभागृह, तिरोडा येथे नवनिर्वाचित राज्यसभा खासदार राजेंद्र जैन यांचा तिरोडा शहर व ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.

यावेळी बोलतांना खासदार राजेंद्र जैन यांनी आपल्या राजकीय प्रवासात खासदार प्रफुल पटेल यांचे नेतृत्व, मार्गदर्शन, विश्वासाचे, व निष्ठेचे फळ मला मिळाले असून, त्यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास आणि जनतेने व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी सदैव प्रामाणिकपणे कार्यरत राहीन अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी त्यांनी उपस्थित सर्व मान्यवर, कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच नागरिकांनी व्यक्त केलेल्या प्रेम, सन्मान व शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक आभार मानले. “आपण सर्वांनी दिलेले प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी सर्वात मोठी प्रेरणा आहे.भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.यावेळी मोठ्या संख्येने तिरोडा तालुक्यातील वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ता तसेच विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.