सालेकसा-राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमातंर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने दि.10 जुलै ते 25 जुलै 2026 या कालावधीत जिल्ह्यातील तीन अतिदुर्गम तालुक्यात “परीसस्पर्श कुष्ठरोग अभियान ” राबविण्यात येत आहे.परीसस्पर्श कुष्ठरोग अभियातुन अतिजोखमीच्या व दुर्गम भागातील गावातील लोकांवर लक्ष ठेवुन तपासणी व जनजागृती करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय दवाखाना यांच्या अंतर्गत परिस्पर्श कुष्ठरोग जनजागृती व तपासणी आरोग्य मेळावा दि. 14 जुलै रोजी सालेकसा येथील आपला दवाखाना येथे आयोजित करण्यात आले होते.यात वैद्यकीय अधिकारी डॉ.भाजीपाले,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.वैरागडे, निम वैद्यकीय कर्मचारी संतोष बोरकर,टीबी सुपरवायझर फरदे यांचेसह कार्यक्षेत्रातील आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा सेविका व नगरपंचायत सालेकसा येतील कर्मचारी उपस्थित होते.सदर शिबीराप्रसंगी कुष्ठरोगाची माहिती सांगून जनजागृती व तपासणी करण्यात आली.यावेळी डॉ.भाजीपाले यांनी कुष्ठरोग आजाराबाबत जनमानसात असलेले भ्रामक अंधश्रद्धा,गैरसमजुती बाबत माहीती घेवुन लोकांना कुष्ठरोग आजाराबाबत मार्गदर्शन केले तसेच निम वैद्यकीय कर्मचारी संतोष बोरकर यांनी कुष्ठरोग बाबत लक्षणे तसेच सद्य स्थितीत शासनामार्फत देण्यात येत असलेले योजनांची माहीतीबाबत मार्गदर्शन केले.





