वर्धा: समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची (Samruddhi Mahamarg Accident) घटना घडली आहे. वर्ध्याच्या विरुळ जवळ रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात (Accident) झाला असून यात पाच जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू (Wardha Samruddhi Mahamarg Accident) झाल्याची माहिती आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, मालवाहू वाहनाने कारला मागून जोरदार धडक दिल्याने हि भीषण अपघाताची घटना घडली आहे. तर हि धडक इतकी भीषण होती कि अपघातानंतर कारने अचानक पेट घेतला. या आगीत कारमधील चार जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर मालवाहू वाहनातील एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी असल्याचीही माहिती आहे.
दरम्यान, इथेनॉल घेऊन जाणारा टँकर पलटी झालेला असल्याने दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू असताना हा अपघात घडला असल्याचे समोर आलं आहे. तर रात्रीच्या सुमारास समोरील वाहनाचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज आहे. तर अपघातानंतर समृद्धी महामार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. तर एका बाजूची वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आलीय. घटनेची माहिती मिळतच महामार्ग पोलीस, पुलगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी जखमींना रुग्णालायात दाखल केले. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मात्र या अपघातनंतर समृद्धी महामार्ग आणि त्यावरील अपघात पुन्हा एकादा चर्चेत आला आहे.
हा अपघात वर्धा जिल्ह्याच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर घडला. इथेनॉल घेऊन जाणाऱ्या एका ट्रकचा आधीच अपघात झाला होता आणि तो महामार्गावर उभा होता, त्यामुळे प्रशासनाला वाहतूक वळवावी लागली. त्याचवेळी, पुण्याहून वर्ध्याकडे जाणारी एक कार भरधाव वेगाने त्या ट्रकला धडकली. धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांना तात्काळ आग लागली. ट्रकचालक आणि क्लिनर यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही, तर कारमधील चार प्रवासी आत अडकले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
प्राथमिक माहितीनुसार, कारमधील चारही जण वर्धा जिल्ह्यातील सालोड गावचे रहिवासी होते. मृतांमध्ये दोन जुळ्या बहिणींचा समावेश होता, ज्या रुग्णालयात दाखल होण्यासाठी पुण्याला गेल्या होत्या, परंतु परत येताना या भीषण अपघाताला बळी पडल्या. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि अग्निशमन दलाची पथके घटनास्थळी दाखल झाली. अपघात इतका भीषण होता की मृतदेह बाहेर काढण्यासाठी कार तोडावी लागली.




