24.4 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home Top News विद्युत स्पर्शाने तरूण शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू

विद्युत स्पर्शाने तरूण शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू

0
42
सडक अर्जुनी,दि.18 : तालुक्यातील घटेगावयेथे जिवंत विद्युत तारांच्या धक्क्याने तरूण शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू झाला. ही घटना १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी उघडकीस आली. लालचंद देवानंद मुनिश्वर (२३) व निशा लालचंद मुनिश्वर (२१)असे मृत शेतकरी दाम्पत्याचे नाव आहे.
देवानंद व निशा हे १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता शिवणटोला शिवारातील आपल्या शेतात मिर्चीच्या पिकाला पाणी देण्याकरीता गेले होते. दरम्यान, त्यांना शेतात पडलेल्या जिवंत विद्युत तारांचा स्पर्शाचा धक्का लागला. यातच दोघांचाही मृत्यू झाला. घटनेच्या वेळी शेतात कुणीच नव्हते. दरम्यान, सायंकाळ होऊनही लालचंद व निशा घरी न परतल्याने, लालचंद आई अंजिराबाई व आजी हे काही ग्रामस्थांना घेऊन शेतावर पोहोचले. त्यावेळीस ही घटना उघउकीस आली. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त होत आहे.munewswar-2
दरम्यान डुग्गीपार पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनाकरीता पाठविले. पुढील तपास पोलीस निरीक्षक केशव बाभळे यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार सुखदास मेश्राम, पोलीस हवालदार साईनाथ नाकाडे, श्याम कोरे, छबीलाल रहांगडाले, महिला पोलीस पूनम हरिणखेडे करीत आहेत.
blank