सात लाख रुपये गोंदिया जिल्ह्यात हस्तगत

0
10

गोंदिया ,दि.18 : गोंदिया जिल्ह्यात सालेकसा आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यात केलेल्या या कारवाईत सात लाख रुपये जप्त करण्यात आले. छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातील छुरिया येथील सतीश जयेशभाई पटेल व त्यांचे देवरी येथील सहकारी ललित पटेल हे देवरी-आमगाव मार्गाने ५ लाख ७ हजार ५00 रूपयांची रोकड घेऊन मध्यपदेशातील लांजीकडे कारने जात होते. सातगावजवळ कारची तपासणी केली असता वाहन क्रमांक सीजी 08,डब्लू 3213 थांबविण्यात आले असता गाडीतील डिक्कीत पाच लाख सात हजार ५00 रूपये पोत्यामध्ये आढळून आले.ही कारवाई सालेकसाचे नायब तहसिलदार एस.एन.बारसागडे व आमगावचे नायब तहसिलदार अजय शामकुडेवार यांच्या पथकाने केली. दुसर्‍या कारवाईत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बरडटोली नाक्यावर भरारी पथकाने केलेल्या कारवाईत गडचिरोली येथील जीवनकुमार बाट यांच्या वाहनात अर्जुनीकडून गडचिरोलीकडे जाणार्‍या अँम्बेसेडर कार मधून २ लाख ५ हजार रुपये आढळून आले.