23.2 C
Gondiā
Thursday, July 23, 2026
Home क्रीडा गोंदियात जिल्हास्तरीय रोप स्किपिंग स्पर्धा उद्या विजेत्यांची सातारा येथील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

गोंदियात जिल्हास्तरीय रोप स्किपिंग स्पर्धा उद्या विजेत्यांची सातारा येथील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

0
11

गोंदिया, 23 जुलै  -स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रोप स्किपिंग असोसिएशन ऑफ गोंदिया यांच्या वतीने १० वी जिल्हास्तरीय रोप स्किपिंग स्पर्धा शनिवार २५ जुलै रोजी शहरातील साकेत पब्लिक स्कूल, गोंदिया येथे पार पडणार आहे.
या स्पर्धेत १२ वर्षांखालील व १४ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटातील खेळाडू सहभागी होणार आहेत. जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजेते खेळाडू येत्या ८ ते १० ऑगस्ट २०२६ दरम्यान सातारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सब ज्युनियर मुला-मुलींच्या रोप स्किपिंग स्पर्धेत गोंदिया जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शाळांनी तसेच खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले असून
स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी संघटनेचे अध्यक्ष चेतन मानकर, सचिव दीपक सिक्का, अतुल बिसेन, मिलिंद रहांगडाले, स्नेहदीप कोकाटे, दीपमाला कुंडेटकर, पंकज बोरकर, जितेंद्र पालंदूरकर, मनीष म्हात्रे, अविनाश बोरकर, अक्षय बनकर, प्रतीक लाडेकर, उज्ज्वल बानासुरे, शुभम पिसोडे, राजा नेवारे, मंगेश कावरे, आदित्य वैद्य यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.

blank