24.8 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home राष्ट्रीय जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाला माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखाताई कुंभारे यांचा पाठिंबा; लाठीचार्जचा निषेध

जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाला माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखाताई कुंभारे यांचा पाठिंबा; लाठीचार्जचा निषेध

0
62

नवी दिल्ली,२३:दिल्लीतील ऐतिहासिक जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या संविधानिक आणि शांततापूर्ण आंदोलनाला महाराष्ट्राच्या माजी राज्यमंत्री तथा कामठीच्या ज्येष्ठ नेत्या अ‍ॅड. सुलेखाताई कुंभारे यांनी प्रत्यक्ष भेट देत पाठिंबा जाहीर केला. यावेळी त्यांनी आंदोलनाचे नेतृत्व करणारे ‘सीजेपी’चे प्रमुख अभिजित दीपके यांच्याशी सविस्तर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांची माहिती घेतली.

भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अ‍ॅड. कुंभारे यांनी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “देशातील तरुण आणि विद्यार्थी हे लोकशाहीचा कणा आहेत. संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करून शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणे अत्यंत निंदनीय आहे. प्रशासनाने दडपशाहीचा मार्ग न अवलंबता विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक संवाद साधावा.”

यावेळी अभिजित दीपके यांनी आंदोलनाची पार्श्वभूमी, विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या आणि गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची माहिती अ‍ॅड. कुंभारे यांना दिली.

अ‍ॅड. सुलेखाताई कुंभारे यांच्यासारख्या अनुभवी नेत्या प्रत्यक्ष जंतर-मंतर येथे भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिल्याने आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे उपस्थितांनी सांगितले.

या प्रसंगी विविध विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा लोकशाही मार्गाने सुरू असलेला हा लढा यशस्वी होईपर्यंत आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असा विश्वास अ‍ॅड. सुलेखाताई कुंभारे यांनी यावेळी व्यक्त केला.

blank