30.7 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home विदर्भ लोकोपयोगी कार्य व राज्याच्या विकासात आदरणीय दादांचे अमूल्य योगदान – खा. राजेंद्र...

लोकोपयोगी कार्य व राज्याच्या विकासात आदरणीय दादांचे अमूल्य योगदान – खा. राजेंद्र जैन

0
3

कामठा येथे वृक्षारोपण व आरोग्य शिबिर संपन्न

गोंदिया- जी.ई.एस.हायस्कूल कामठा, ता गोंदिया येथे वृक्षारोपण व आरोग्य तपासणी शिबीर खा.राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून ”वृक्ष माझी माऊली – वृक्ष माझी सावली” चा संदेश देण्यात आला. या शिबिरामध्ये नागरिकांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रक्तदाब, मधुमेह तपासणी तसेच विविध आजारांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन व औषध वाटप करण्यात आले.

राज्याचे लोकप्रिय, विकासप्रिय लोकनेता स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यासह गोंदिया जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. आदरणीय दादांची समाजसेवेप्रती असलेली तळमळ व विकास कामाला पूर्णत्वास नेण्यासाठी घालून दिलेली शिस्त याचा अभिमान वाटावा तेवढा कमीच आहे. आदरणीय दादांच्या लोकोपयोगी व राज्याच्या विकासात असलेला अमूल्य योगदानाबद्दल त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करण्यासाठी जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे असे प्रतिपादन खासदार राजेंद्र जैन यांनी केले.

सर्वश्री राजेन्द्र जैन, कुंदन कटारे, रितेश मलधाम, मनोज दहिकर, रेखा जगने, विजय लोणारे, पृथ्वीराज नागपूरे, विजय लिल्हारे, गंगाराम कापसे, प्रकाश सेवतकर,रवि अग्रवाल, तुमेश पण्डेले, सपना अग्रवाल, सुशील खरकाटे, राजकुमार गजभिये, अमन खोब्रागडे, उमेन्द्र गजभिये, महेन्द्र गजभिये, छबिलाल अग्रवाल, दुरुग बाहे, सतीश जगने, तृष्ना चटर्जी, समता गनवीर, संदीप लंजे, मनोज चौहान, ताराचंद मामूलडे, संदीप गोखे, योगेश राखडे, विराज भेंडारकर, प्रकाश भगत, कैलाश आसोले, बिरजू मुंडेले सहित अन्य प्रामुख्याने उपस्थित होते.

blank