30.9 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home विदर्भ वृक्ष माझी सावली – वृक्ष माझी माउली’ ”एक वृक्ष, हरित भविष्य’चा संदेश

वृक्ष माझी सावली – वृक्ष माझी माउली’ ”एक वृक्ष, हरित भविष्य’चा संदेश

0
4

लोकनेते स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त खासदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते वृक्षारोपण

गोंदिया-लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित “जनसेवा सप्ताहाच्या” अनुषंगाने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी मनोहरभाई पटेल नॉलेज सिटी, कुडवा व फणेंद्रनाथ चौक, गोंदिया येथे आदरणीय दादांच्या संकल्पनेतील हरित महाराष्ट्र “वृक्ष माझी सावली – वृक्ष माझी माउली” तसेच “एक वृक्ष, हरित भविष्य” हा संदेश खासदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते वृक्षारोपण करून देण्यात आला.

यावेळी खासदार राजेंद्र जैन यांनी लोकनेते आदरणीय स्व.अजितदादा पवार यांचे राज्याच्या विकासात असलेले अमूल्य योगदान व आदरणीय दादांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी व पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपण सर्वांनी किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले.

या वृक्षारोपण कार्यक्रमात सर्वश्री राजेंद्र बिसेन, राजेश व्यास, सुनील पटले, शैलेश वासनिक, लखन बहेलिया, आनंद अग्रवाल, विनायक गजघाट, झनकलाल ढेकवार, विक्रम बहेलिया, योगेंद्र जैतवार, सुनील जायस्वाल, तुषार उके, मोहनभाई पटेल, बंडू चामट, मनोज भोयर, गौरव शेंडे, आनंद कावळे, भरत बहेलिया, लखन धावडे, विवेक खरोसे, भरतसिंग गौर, ए एम. जायस्वाल, कांतीभाई पटेल, जितू ज़ायस्वाल, अभय बचवाणी, विश्वनाथ जगणे, विवेक करोले, धर्मराज बोपचे, भैय्यालाल ठाकरे, चिराग बावनथडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

blank