गोंदिया, दि.01 :पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सद्य स्थितीत सालेकसा तालुक्यातील दरेकसा येथे हिवताप जन्य परिस्थिती होती.सदर परिस्थितीची पाहणी व आरोग्य प्रशासनामार्फत करण्यात येत असलेली प्रतिबंधात्मक उपाययोजनेची माहीती घेण्यासाठी दि.27 जुलै पासुन दररोज सालेकसा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा अंतर्गत हिवतापाकरीता अति संवेदनशिल असलेले अतिदुर्गम मुरकुटडोह,दंडारी, दलदलकुही, टेकाटोला,नवाटोला व पिपरिया येथे भेटी दिल्या. त्या पाठोपाठ लगतचा तालुका देवरी येथील मुल्ला,फुटाणा,घोनाडी,ककोडी व पालांदुर/जमी येथील आरोग्य संस्थाना भेटी देत आहेत.गेल्या तीन ते चार दिवसापासुन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.चव्हाण यांचा देवरी व सालेक्यात डेरा आहे.सालेकसा येथील दरेकसा येथील हिवताप दुषित रुग्णाची विचारपुस करुन दिल्या जात असलेल्या औषधोपचाराची माहिती जाणुन घेतली.किटकजन्य कार्यक्रमाची पाहणी केली.गावात आशा सेविका व आरोग्य कर्मचार्यामार्फत ताप रुग्ण व कंटेनर शोध मोहिमेची माहीती जाणुन घेतली. गावात प्रत्यक्ष लोकांशी संवाद साधला.त्यावेळी सालेकसा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील आत्राम सुद्धा उपस्थित होते.
सालेकसा नजीकच्या देवरी तालुक्यात जिल्हा हिवताप अधिकारी डॉ चव्हाण यांची हिवताप नियंत्रणा करिता आपल्या टीम सोबत भेट दि.29 जुलै रोजी जिह्यात हिवताप नियंत्रणाच्या उद्देशाने जिल्ह्यातील सालेकसा येथील हिवताप रुग्णाच्या संख्येत वाढ पाहता देवरी तालुक्यातील फुटाणा व मुल्ला प्राथमिक आरोग्य केंद्रातील भरेगाव,फुटाणा व मुल्ला,पिंडकेपार येथे भेटी दिल्या.मुल्ला येथे आरोग्य कर्मचारी,आरोग्य सेविका व आशा सेविका यांची सभा घेऊन हिवताप,हत्तीरोग,डेंग्यू व चिकूनगुनिया,स्क्रब टायफस नियंत्रणाबाबत बाबत सभा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले.जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चौहान यांच्या सोबत त्यांच्या टीम मधील दोन आरोग्य सेवक,आरोग्य सहायक व आरोग्य पर्यवेक्षक यांनी कार्यक्षेत्रात जाऊन कामाची तपासणी केली.कार्यक्षेत्रातील नियोजनाबाबत जिल्हा हिवताप अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.
देवरी तालुक्यातील कीटकजन्य आजाराच्या नियंत्रणा करिता मुल्ला येथील डॉ.येरणे व फुटाणा येथील डॉ.बडवाईक,डॉ.पीयुष गभने यांचे सोबत जिल्हा आरोग्य पर्यवेक्षक एन.के.भालेराव,निरीक्षक फरकुंडे,दिपेवाड व गजभिये तसेच प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी किशोर ठाकरे उपस्थित होते.भेटी प्रसंगी आरोग्य संस्थेचे सामुदायिक आरोग्य अधिकारी,आरोग्य सेविका,आरोग्य सेवक व आशा कार्यकर्ती हजर होत्या





