30.1 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ महसूल प्रशासनातील उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते गौरव

महसूल प्रशासनातील उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते गौरव

0
9
महसूल दिनानिमित्त विविध संवर्गांतील गुणवंतांचा सन्मान
विभागीय आयुक्त पुरस्कारासाठी अनेकांची शिफारस
वाशिम, दि.2 ऑगस्ट : महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकाभिमुख, पारदर्शक आणि परिणामकारक प्रशासनासाठी समर्पित भावनेने कार्य करावे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान हा इतरांसाठी प्रेरणादायी ठरतो आणि सेवेची गुणवत्ता अधिक उंचावण्यास मदत करतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते महसूल विभागातील विविध संवर्गांतील उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
जिल्हास्तरीय निवड समितीने उल्लेखनीय कार्याच्या आधारे विविध संवर्गांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड केली असून, अनेकांची विभागीय आयुक्त पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
यानिमित्त उपजिल्हाधिकारी संवर्गात उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव आणि उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार संवर्गात राजेंद्र पाटील व निलेश पळसकर, नायब तहसीलदार संवर्गात अनिल वाडेकर, सुनिल घोडे, रावसाहेब देशपांडे व सुनिल देशमुख यांचा गौरव करण्यात आला.
तसेच लघुलेखक संवर्गात विनोद विसरकर व सुनिल क-हाळे, अव्वल कारकून संवर्गात गजानन उगले, गोरख इढोळे, सीमा गाडे, संजिवनी वानखडे, श्रीराम गवई आणि माधव शिंदे, मंडळ अधिकारी संवर्गात चंद्रशेखर मनवर, समाधान जावळे, आशा आदबणे व एन. एम. इंगळे यांचा सन्मान करण्यात आला.
महसूल सहाय्यक संवर्गात गणेश ढोरे, किशोर पांडव, सुधाकर पडघान, दिलीप चोंडकर आणि प्रशांत देशपांडे, तलाठी संवर्गात शैलेश घोगरे, शिवकन्या कोतीवार, रेखा पटुकले, सुधीर कोल्हे आणि अश्विनी इंगोले, शिपाई संवर्गात विशाल नप्ते, विश्वनाथ घनघाव, अमोल लाहोरे, सुरेश लोखंडे, विलास चव्हाण, भास्कर गवळी आणि गणेश चौके यांचा गौरव करण्यात आला.याशिवाय वाहन चालक संवर्गात गजानन बडवे व किशोर इंगोले, कोतवाल संवर्गात रवि आरु, सचिन भगत, रुपाली गोरे आणि संदीप तागड, पोलीस पाटील संवर्गात छायाबाई डहाके, शामराव धाबे व राहुल कांबळे, तर नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन संवर्गात आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव करण्यात आला.
यापैकी विविध संवर्गांतील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांची विभागीय आयुक्त पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली असून, त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल जिल्हास्तरावर घेण्यात आली. कार्यक्रमामुळे महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिक प्रेरणा मिळाली.