27.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व – समाधान’ शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद!.

‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व – समाधान’ शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद!.

0
4

खासदार प्रफुल पटेल, आमदार राजकुमार बडोले व आमदार अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रमुख उपस्थिती

सडक अर्जुनी- ग्रामीण भागातील जनतेच्या दैनंदिन समस्यांचे जागीच निवारण करणे, महसूल व प्रशासकीय कामकाज अधिक लोकाभिमुख, पारदर्शीव गतिमान करणे आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ अंतिम घटकापर्यंत पोहोचवणे, या उद्देशाने सडक अर्जुनी येथील आशीर्वाद लॉन येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान’ विधानसभा स्तरीय शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले. या शिबिराला हजारो नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते व खासदार प्रफुल पटेल उपस्थित होते. तर स्वागताध्यक्ष आमदार राजकुमार बडोले, प्रमुख अतिथी आमदार अविनाश ब्राह्मणकर, अप्पर जिल्हाधिकारी अभिजित घोरपडे, जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्यासह तहसीलदार, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, पंचायत समिती व नगरपंचायतीचे लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार प्रफुल पटेल यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, महायुती सरकार सर्वसामान्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून, शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हीच सरकारची प्राथमिकता आहे. नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करून त्यांना शासकीय फेऱ्यांपासून मुक्ती देण्याच्या कडक सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत विधानसमा स्तरीय समाधान शिबीर स्वागताध्यक्ष आमदार राजकुमार बडोले यांनी शिबिराच्या माध्यमातून जमीनविषयक कागदपत्रे, दाखले, फेरफार आणि विविध योजना एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्याबद्दल महसूल विभागाचे कौतुक केले.दिवसभर चाललेल्या या शिबिरात संजय गांधी निराधार योजना, पीएमकिसान, पीएमएफएमई, आयुष्मान भारत, उमेद, बचत गट कर्जवाटप, रेशन कार्ड वितरण, मालकी हक्काच्या सनदा, वनपट्टे, ‘जिवंत सातबारा’ अभियान, श्रावणबाळ योजना व राजमाता जिजाऊ महिला सशक्तीकरण योजना अशा विविध विभागांच्या योजनांचे प्रमाणपत्र व लाभहजारो लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात आले. या प्रसंगी सीताताई रहांगडाले, लक्ष्मण भगत, चेतन वडगाये, आम्रपाली डोंगरवार, सुधाताई रहंगडाले, यशवंत गणवीर, डॉ. अविनाश काशीवार, तेजराम मडावी, राजेश कठाणे, लोकपाल गहाणे, रमेश चुन्हे, शिवाजी गहाणे, रजनीताई गिरीपुंजे, वंदना डोंगरवार, कामिनी कोवे, शाहिस्ता शेख, दीक्षा भगत, रीता लांजेवार, योगेश नाकाडे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.