25.8 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home विदर्भ अवयवदान-जीवनदानाचा संकल्प अभियान 3 ते 15 ऑगस्ट दरम्यान,जनजागृतीचे विविध उपक्रम सुरू

अवयवदान-जीवनदानाचा संकल्प अभियान 3 ते 15 ऑगस्ट दरम्यान,जनजागृतीचे विविध उपक्रम सुरू

0
5

गोंदिया, दि.5 : महाराष्ट्रातील अवयवदानाचे प्रमाण वाढावे व अवयवदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना नवजीवन मिळावे यासाठी दि.3 ते 15 ऑगस्ट दरम्यान अवयवदान ही एक चळवळ म्हणून राज्यभरात राबविण्याचा संकल्प सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केला आहे. त्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यात दि.3 ते 15 ऑगस्ट पर्यंत ‘अवयवदान पंधरवाडा’ संपूर्ण महाराष्ट्रात राबविले जाण्याचे मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत.

सोमवार 3 ऑगस्ट रोजी के.टी.एस. जिल्हा सामान्य रुग्णालयात अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांचे मार्गदर्शक सुचनेनुसार अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे  व सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे यांचे हस्ते ‘अवयवदान पंधरवाडा’ अभियानाला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.

दि.3 ऑगस्ट रोजी अवयवदान प्रभातफेरी व शपथ घेण्याच्या माध्यमातुन जनजागृती करण्यात आली. प्रभातफेरी दरम्यान अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.भारती जयस्वाल, जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी विजय आखाडे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरजंन अग्रवाल, शल्य चिकित्सक डॉ.गुरुप्रकाश खोब्रागडे, डॉ.राजेश बेलमकर, डॉ.अनिल आटे, डॉ.मिना वट्टी, डॉ.ज्योती राठोड, डॉ.कांचन भोयर, डॉ.सोनम जाधव, नेत्र जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चंद्रकिशोर पारधी, नेत्रदान समुपदेशक भाविका बघेले/नागपुरे, नेत्र सहाय्यक रिता अरोरा, योगशिक्षिका मनीषा पशीने, स्वाती पाटील, सपना खंडाईत, संध्या शंभरकर यांनी शहरात प्रभातफेरीने विविध पोष्टरच्या माध्यमातुन अवयवदानाची जनजागृती केली. यावेळी के.टी.एस. प्रांगणात अवयवदानाचा संकल्प घेवुन प्रतिज्ञा घेण्यात आली.

अवयवदानाबाबत समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे, त्यासंदर्भातील गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर करणे तसेच अधिकाधिक नागरिकांना अवयवदानासाठी प्रेरित करणे हा या पंधरवड्याचा मुख्य उद्देश आहे. अवयवदानामुळे अनेक गंभीर रुग्णांना नवजीवन मिळू शकते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने समाजहिताच्या या कार्यात सहभागी होऊन अवयवदानाचा संकल्प करावा,असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.यावर्षी ‘अवयवदान जीवनदानाचा सर्वोत्तम संकल्प’ या संकल्पनेवर आधारित विविध जनजागृती उपक्रम जिल्हाभर राबविण्यात येणार आहेत.

अवयवदानासाठी कार्यरत संस्थांच्या समन्वयातून नागरिकांना अवयवदानाची प्रक्रिया, त्याचे महत्त्व आणि कायदेशीर बाबींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका तसेच सामाजिक संस्थांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

पंधरवड्यानिमित्त जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्था, वैद्यकीय महाविद्यालये, शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था तसेच सामाजिक व धार्मिक संस्थांच्या सहभागातून जनजागृती रॅली, शपथविधी, व्याख्याने, चर्चासत्रे, पोस्टर व घोषवाक्य स्पर्धा, आरोग्य शिक्षण, समाजमाध्यमांद्वारे जनजागृती तसेच अवयवदानाविषयी यशोगाथा आणि अनुभव कथन यांसारखे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.