गोंदिया। साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून लहुजी शक्ती सेना मातंग समाज, गोंदिया यांच्या वतीने स्वागत लॉन, गणेशनगर, गोंदिया येथे जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार राजेंद्र जैन, प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विनोद अग्रवाल व मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य आणि शाहिरीच्या माध्यमातून वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाच्या व्यथा प्रभावीपणे मांडल्या. त्यांच्या विचारांचा आणि सामाजिक समतेचा संदेश आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे खासदार राजेंद्र जैन यांनी प्रतिपादित केले.
![]()
सर्वश्री लोकेश यादव,रुपेश कुथे, पवन मोरे, केतन तुरकर, चंदन वानखेडे, गजेंद्र लोखंडे, परेश लोखंडे, सचिन लोखंडे, विजय कर्णे, मुन्नालाल लोखंडे, गौरव वानखेडे, सोनू डोंगरे, विकी वानखेडे, यश वानखेडे, नरेंद्र बावणे, खुशाल बावणे, चित्रा लोखंडे, मीना लोखंडे, प्रतिभा कर्णे, मीना बावणे, ज्योत्स्ना वानखेडे, सविता डोंगरे, अंजली तायवाडे, अर्चना गायकवाड सहित मंडळाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





