तिरोडा-जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तसेच जिल्हाध्यक्ष रविकांत बोपचे यांच्या प्रमुख उपस्थितीत राणी अवंतीबाई चौक, तिरोडा येथे अल्पोपहार वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला.रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित या कार्यक्रमात आदिवासी समाजाच्या समृद्ध परंपरा, संस्कृती, इतिहास आणि सामाजिक योगदानाला अभिवादन करण्यात आले. आदिवासी समाजाने देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय जडणघडणीत दिलेले योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असून, त्यांच्या हक्कांचा आणि सन्मानाचा आदर करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित आदिवासी बांधव व नागरिकांना अल्पोहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे गोंदिया जिल्हाध्यक्ष रविकांत बोपचे यांच्या सह महिला जिल्हाध्यक्ष मेघाताई बिसेन, जिल्हा सरचिटणीस नासिर घाणीवाला, शहर अध्यक्ष विजय बुद्धे, महिला अध्यक्ष मंदाताई टेंभरे, ओबीसी सेल अध्यक्ष महेश कुकडे, शहर युवक अध्यक्ष टिपू सैय्यद, अल्पसंख्याक अध्यक्ष जॉनी सैय्यद,मंगेश गेडाम, सरपंच रविंद्र भगत,डीलेन्द्र बिसेन,मंगेश दमाहे ,यंद्रराज वासनिक,गुणराज भैरम, सुशिल बोपचे,विनोद कुकडे,प्रकाश करीहार,राजेश गोटफोडे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आदिवासी समाजाच्या गौरवशाली इतिहासाला नमन करत सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सर्वसमावेशक विकासाचा संदेश देत हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.





