28.7 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home शैक्षणिक भंडारा जिल्ह्यातील ४१ विद्यार्थी इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी रवाना

भंडारा जिल्ह्यातील ४१ विद्यार्थी इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी रवाना

0
4

भंडारादि. १० : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासोबतच अवकाश संशोधन व तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती मिळावीया उद्देशाने भंडारा जिल्ह्यातील ४१ विद्यार्थी इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी आज रवाना झाले. यावेळी जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

 यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी सावनकुमार म्हणाले कीइस्रो ही उपग्रह व अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असलेली देशातील अग्रगण्य संस्था आहे. उपग्रह तंत्रज्ञानामुळे आज दैनंदिन जीवनातील अनेक सुविधा अधिक सुलभ झाल्या आहेत. इस्रोला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कार्यपद्धती व अवकाश तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना मिळणार असल्याने त्यांच्या वैज्ञानिक ज्ञानात निश्चितच भर पडेल. या अभ्यास दौऱ्यानंतर विद्यार्थ्यांशी पुन्हा संवाद साधून त्यांचे अनुभव जाणून घेण्याची आपली इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजेश रुद्रकार यांनी केले.

 जिल्ह्यातील सातही तालुक्यांमधून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसोबत ४ शिक्षक/कर्मचारी व एक डॉक्टर असा चमू या अभ्यास दौऱ्यावर रवाना झाला आहे. दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांना इस्रोच्या विविध वैज्ञानिक उपक्रमांचीअवकाश तंत्रज्ञानाचीउपग्रह निर्मितीची तसेच संशोधन व विकास कार्याची प्रत्यक्ष माहिती घेता येणार आहे. 

यावेळी महिला अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य वर्षा चांदेवारउपशिक्षणाधिकारी राहुल बावा आणि जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या अभ्यास दौऱ्याचा शैक्षणिकदृष्ट्या अधिकाधिक लाभ घेऊन वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करावाअसे आवाहन यावेळी करण्यात आले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अधिव्याख्याता डॉ. गंगाधर वाळले यांनी केले.

blank