25.1 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home विदर्भ आदिवासी आश्रमशाळांमध्ये सुविधा उपलब्ध नसल्यास नोटीस द्या

आदिवासी आश्रमशाळांमध्ये सुविधा उपलब्ध नसल्यास नोटीस द्या

0
13

पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचे निर्देशमहिनाभरात सुविधांबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश

भंडारादि. १३ : जिल्ह्यातील अनुदानित आदिवासी आश्रमशाळांची नियमित तपासणी करून विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत की नाहीयाची खातरजमा करावी. सुविधा उपलब्ध नसल्याचे आढळल्यास संबंधित आश्रमशाळांना तत्काळ नोटीस बजावावीअसे निर्देश पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज सकाळी जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुविधाअंगणवाडी इमारती तसेच जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाबाबत सविस्तर आढावा घेतला.

आश्रमशाळांमध्ये कोणताही विद्यार्थी सुविधेअभावी जमिनीवर झोपणार नाहीयाची विशेष दक्षता घेण्यात यावी. याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून एका महिन्यात अहवाल सादर करावाअसे निर्देश पालकमंत्र्यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पभंडाराचे प्रकल्प अधिकारी श्री. हेडाऊ  यांना दिले.

अंगणवाडी इमारतींसाठी तातडीने आराखडा तयार करा

जिल्ह्यातील अंगणवाडी इमारतींच्या स्थितीचा आढावा घेताना जिल्ह्यातील एकूण १६५ अंगणवाड्यांपैकी ८१ अंगणवाड्यांना स्वतःच्या इमारती आहेत२ अंगणवाड्या शाळेच्या इमारतीत भरताततर ८२ अंगणवाड्या भाड्याच्या इमारतीमध्ये भरतातअशी माहिती बैठकीत देण्यात आली.भंडारा शहरातील ५२ अंगणवाड्यांपैकी केवळ ८ अंगणवाड्यांना स्वतःच्या इमारती असून ४४ अंगणवाड्या भाड्याच्या इमारतीत भरत असल्याचेही बैठकीत निदर्शनास आले.

जिल्ह्यातील अंगणवाड्यांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी आणि बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या संयुक्त समन्वयाने समिती गठित करावी. या समितीने जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांची पाहणी करून नवीन इमारतींच्या बांधकामासह आवश्यक विकासकामांचा प्रस्ताव तातडीने सादर करावाअसे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

भाड्याच्या इमारतीमध्ये भरत असलेल्या प्रत्येक अंगणवाडीमध्ये पिण्याचे पाणीसंरक्षण भिंत आणि शौचालयाची सुविधा उपलब्ध आहे की नाहीयाची स्वतंत्रपणे तपासणी करून अहवाल सादर करावा. या अहवालाच्या आधारे पुढील विकास आराखडा तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करा

जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीमध्ये सुरू असलेल्या बांधकामाच्या पार्श्वभूमीवर इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट प्राधान्याने पूर्ण करून पुढील कामांचा आराखडा सादर करावाअसे निर्देश पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजीत कुचेवार यांना दिले.बैठकीस जिल्हाधिकारी सावनकुमारपोलीस अधीक्षक निलेश मोरेअपर पोलीस अधीक्षक निलेश भरणेनिवासी उपजिल्हाधिकारी कमला मनोहर चव्हाण यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांचा आढावा घेऊन नागरिकांना व विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

blank