चित्रा कापसे/तिरोडा-जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी पतसंस्था मर्यादित, भंडारा या संस्थेच्या गोंदिया शाखाध्यक्षपदी कन्हैयालाल साधुजी रहांगडाले यांची बहुमताने निवड करण्यात आली.११ ऑगस्ट २०२६ रोजी कोहमारा येथील शाखा कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष संजीव बावनकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संचालकांची सभा घेण्यात आली. या सभेत गोंदिया शाखाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडीत कन्हैयालाल साधुजी रहांगडाले यांची बहुमताने निवड करण्यात आली.
जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी पतसंस्था मर्यादित, भंडारा ही भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांतील सर्वात मोठी पगारदार कर्मचारी पतसंस्था असून संस्थेची वार्षिक उलाढाल सुमारे ७०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले.
रहांगडाले यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजीव बावनकर, उपाध्यक्ष विजय डोये, माजी उपाध्यक्ष शंकर चव्हाण, सर्व शाखाध्यक्ष व संचालक तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संघटक नुतन बांगरे, विभागीय अध्यक्ष केदार गोटेफोडे, अय्युब खान, राज्य पदाधिकारी उमाशंकर पारधी, जिल्हा उपाध्यक्ष राजू गुन्हेवार, माजी संचालक जितेंद्र डहाटे, डी. डी. रिनायत, तालुकाध्यक्ष शीतल कनपटे, सरचिटणीस विजय पारधी, कार्याध्यक्ष शैलेंद्र कोचे, नरेश पटले, राजेश पटले, आर. डी. ढोरे, दिलीप हिरापुरे, राजकुमार चामट, सी. एस. पटले, यू. पी. बिसेन, नरेंद्र आगाशे, धननपाल पटले तसेच सर्व संघ पदाधिकारी व मित्रमंडळींनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.कन्हैयालाल रहांगडाले यांच्या नेतृत्वाखाली गोंदिया शाखेच्या कार्याला अधिक गतिमानता मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.





