24.9 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ आमदारांसह शासकीय आश्रमशाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ

आमदारांसह शासकीय आश्रमशाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ

0
7

देवरी-स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, पुराडा येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी ध्वजारोहनानंतर तंबाखूमुक्तीचा संकल्प करण्यात आला.यावेळी आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजयदादा पुराम यांच्या उपस्थितीत शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच उपस्थित मान्यवरांनी तंबाखूमुक्तीची शपथ घेतली.
यावेळी शाळेचे प्राचार्य कमल कापसे, जिल्हा परिषद सदस्य सविताताई पुराम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण टप्पे, समितीचे सर्व पदाधिकारी, गावातील गणमान्य नागरिक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. स्वतः तंबाखूचे सेवन न करण्यासोबतच इतरांनाही तंबाखूमुक्त जीवन जगण्यासाठी प्रेरित करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.
यानंतर ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत आमदार संजय पुराम, जिल्हा परिषद सदस्य सविताताई पुराम, प्राचार्य कमल कापसे, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्साहात तिरंगा रॅली काढली. रॅलीदरम्यान देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
रॅलीनंतर भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून तेथेही ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, सामाजिक बांधिलकी, व्यसनमुक्ती आणि राष्ट्रप्रेमाची भावना दृढ करण्याचा संदेश देण्यात आला,यानंतर शासकिय आश्रम शाळा पुराडा येथे विद्यार्थ्यांची भाषण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा,वादविवाद स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमा अंतर्गत विवीध रंगांरंग कार्यक्रम घेण्यात आले त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीची निवडणूक घेण्यात आली यामध्ये श्रीकृष्ण टप्पे यांची अध्यक्षपदावर फेरनिवड पुनश्च करण्यात आली.