29.1 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home Top News फुटीरवादी नेते सीमारेषेपार दहशतवाद्यांच्या संपर्कात

फुटीरवादी नेते सीमारेषेपार दहशतवाद्यांच्या संपर्कात

0
33

नवी दिल्ली, दि. 23 – काश्मिरी फुटीरवादी नेते आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी एकमेकांच्या संपर्कात आहेत. गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी लोकसभेत बोलताना ही माहिती दिली आहे. काही फुटीरवादी नेते नियंत्रणरेषेपार आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांच्या संपर्कात आहेत अशी माहिती त्यांनी दिली. तसंच काश्मीर खो-यात अशांतता राहावी यासाठी पाकिस्तानकडून या नेत्यांना स्पष्ट सूचना मिळत असून त्यासाठी निधीही दिला जात असल्याचं ते बोलले आहेत.