29.1 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home विदर्भ कर्जापायी युवा व्यवसायिकाची आत्महत्या

कर्जापायी युवा व्यवसायिकाची आत्महत्या

0
29

मोहाडी दि.२३:: येथील क्रिष्णा इंटरप्राइजेसचे संचालक क्रिष्णा तुकाराम निमजे (३१) यांनी आपल्या राहत्या घरी २० नोव्हेंबरला गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उपचारार्थ त्यांना जिल्हा रुग्णालय व त्यानंतर नागपुरला दाखल केले होते. मात्र  सोमवारी रात्री १० वाजता प्राणज्योत मालविली. त्यांच्यावर बँकांचे जवळपास पाच लाखांचे कर्ज असल्याची माहिती आहे. निमजे हे लोकमत समाचारचे मोहाडी तालुका प्रतिनिधी होते. व्यवसायात मंदी असल्याने कर्ज कसे फेडायचे याच विवंचनेत ते होते. त्यांच्यामागे वडील, पत्नी, मुलगी, मुलगा(७ महिने), दोन भाऊ, बहिणी असा आप्तपरिवार आहे.

blank