27.5 C
Gondiā
Wednesday, August 26, 2026
Home विदर्भ तिरखेडी येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर’

तिरखेडी येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर’

0
5

सालेकसा,दि.२६ः प्राथमिक आरोग्य केंद्र गोर्हे अंतर्गत ग्राम पंचायत तिरखेडी येथे माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियान अंतर्गत दि.25 ऑगस्ट रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य, योग व जीवनशैली मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.प्राथमिक आरोग्य केंद्र गोर्हेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.भगवतप्रसाद बारई यांच्या कल्पक संकल्पनेतुन तिरखेडी येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर, योग, मानसिक आरोग्य तसेच जीवनशैली व आहार मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.

शिबीराप्रसंगी ज्येष्ठ नागरिकांचे रक्तदाब, रक्तातील साखर आणि वजन व बीएमआय तपासणी सोबत नियमित योगाभ्यास, मानसिक आरोग्य, संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैली याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबीराप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.भगवतप्रसाद बारई,आरोग्य सेविका प्रिती गेडाम,आशा सेविका अनिता पटले ,आशा सेविका यांनी आरोग्य सेवा प्रदान केली.

ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे, त्यांना योग व व्यायामाची सवय लागावी, मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी तसेच योग्य आहार व जीवनशैलीचा अवलंब करता यावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.