27.5 C
Gondiā
Wednesday, August 26, 2026
Home विदर्भ कारंजा येथे गुटखा,तंबाखू बाबत धाडसत्र ;23 पानटपरी दुकानदारांकडून 5000 रूपयाचा दंड वसूल

कारंजा येथे गुटखा,तंबाखू बाबत धाडसत्र ;23 पानटपरी दुकानदारांकडून 5000 रूपयाचा दंड वसूल

0
11

गोंदिया,दि.२६ः-राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदियाच्या वतीने कारंजा हद्दीतील विविध ठिकाणी सार्वजनिक ठिकाणे व पानटपरी दुकानांवर धाडसत्र राबवुन धूम्रपान निषिद्ध क्षेत्राचा व तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांचे पोष्टर वाटप करुन जनजागृती करण्यात आली.

जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या प्रभावी अमलबजावणीसाठी आरोग्य विभागामार्फत पथकांची निर्मिती करण्यात आली आहे.सर्व शासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणी तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ बाळगणे,त्यांचे सेवन करण्यास मनाई आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालये,सार्वजनिक ठिकाणांवर तपासणी करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी दिले आहेत.जिल्ह्यातील सर्वच  शासकीय कार्यालये व सार्वजनिक ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.तृप्ती कटरे व पोलीस निरीक्षक वैभव पवार यांच्या मार्गदर्शनात कारंजा हद्दीतील विविध सार्वजनिक ठिकाणे व 23 पानटपरी दुकानांवर धाड टाकून तंबाखू, गुटखा खाणाऱ्या व बाळगणाऱ्यावर तंबाखू नियंत्रण कोटपा कायदा 2003 अंतर्गत दंडात्मक कारवाई करून 5000/‌-रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहीती जिल्हा सल्लागार डॉ.ज्योती राठोड यांनी दिली आहे.

ही कार्यवाही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.तृप्ती कटरे व पोलीस निरीक्षक वैभव पवार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा सल्लागार डॉ.ज्योती राठोड, मनोवैज्ञानिक सुरेखा आझाद मेश्राम, सामाजिक कार्यकर्ता संध्या शंभरकर, दंत तंत्रज्ञ यश जयस्वाल, दंत सहाय्यक विवेकानंद कोरे यांचेसह पोलीस विभागाचे पोलिस हवालदार बालेश्वर ठाकूर बक्कल नंबर 1962 व ज्योती सव्वालाखे बक्क्ल नंबर 1116 यांनी पार पाडली.तंबाखू सोडण्याकरिता टोल फ्री क्रमांकाची तसेच कोटपा कायदा 2003 ची आय.ई.सी. देऊन जनजागृती करण्यात आली.