24.4 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home महाराष्ट्र राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीच्या सदस्यांनी घेतली पंतप्रधान मोदीची सदिच्छा भेट

राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीच्या सदस्यांनी घेतली पंतप्रधान मोदीची सदिच्छा भेट

0
31

मुंबई, दि. 24 : राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीच्या सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी नवी दिल्ली येथील संसद भवनात सदिच्छा भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. केंद्रिय माहिती व प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू, राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी, राज्याचे माहिती व जनसंपर्क सचिव ब्रिजेश सिंह
यावेळी उपस्थित होते.

यावेळी शिष्टमंडळाने विविध विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. ज्येष्ठ पत्रकार प्रदीपकुमार मैत्र, उन्मेष पवार, मधु कांबळे, चंद्रकांत शिंदे, कृष्णा शेवडीकर, राजू इनामदार, चंद्रशेखर बेहरे, नंदकुमार सुतार, प्रसाद काथे, प्रकाश कुलथे, योगेश जाधव, शंतनू डोईफोडे, रवींद्र बेडकीहाळ, विनोद जगदाळे आदी यावेळी उपस्थित होते.