24.8 C
Gondiā
Tuesday, September 1, 2026
Home राजकीय राहुल गांधींवरील कारवाईच्या निषेधार्थ गोंदिया जिल्हा काँग्रेसचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

राहुल गांधींवरील कारवाईच्या निषेधार्थ गोंदिया जिल्हा काँग्रेसचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

0
15
गोंदिया:उत्तराखंडमधील हल्द्वानी प्रकरणात लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात हल्द्वानी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या ‘एफआयआर’च्या निषेधार्थ गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने उपविभागीय अधिकारी याना राष्ट्रपतींच्या नावे असलेले निवेदन सादर करण्यात आले.
हल्द्वानी येथील रामलीला मैदान परिसरात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभास्थळाचे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेले ‘शुद्धीकरण’ हे अत्यंत निंदनीय व घृणास्पद असल्याचा आरोप काँग्रेसतर्फे करण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल केलेला द्वेषपूर्ण एफआयआर तात्काळ मागे घेण्यात यावा आणि रामलीला मैदानाचे तथाकथित शुद्धीकरण करून सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या भाजप व आरएसएसच्या कार्यकर्त्यांवर कठोर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव पी. जी. कटरे, गोंदिया तालुका अध्यक्ष रमेश अंबुले, जीवनलाल क्षीरसागर, शहर काँग्रेस अध्यक्ष जहीर अहमद, हेमेंद्र राहंगडाले,मनिष मेश्राम,  आनंद लांजेवार,  डी. एन. येळे,रणजीत गणवीर, राजकुमार पटले, राजू चामट,मनोज पटनायक, क्रिपाल लिल्हारे आणि भूपेंद्र हरिनखेडे यांच्यासह पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.