30.3 C
Gondiā
Thursday, September 10, 2026
Home Featured News पोळ्यानिमित्त वाघहल्ला, वीज दुर्घटना व रानडुकराच्या हल्ल्यातील पीडितांना ‘आनंदाचा शिधा’ वाटप

पोळ्यानिमित्त वाघहल्ला, वीज दुर्घटना व रानडुकराच्या हल्ल्यातील पीडितांना ‘आनंदाचा शिधा’ वाटप

0
6

वृद्ध माय-माऊलींसह गरजू कुटुंबांच्या घरात पोहोचविला सणाचा आनंद; माणुसकीच्या उपक्रमातून आपुलकीचा संदेश

गोरेगाव (प्रतिनिधी):पोळा हा ग्रामीण भागातील शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या जीवनाशी जोडलेला अत्यंत महत्त्वाचा सण. मात्र, विविध अपघाती संकटांमुळे खचलेल्या कुटुंबांसाठी सणाचा हा आनंद अनेकदा दुःखाच्या सावटाखाली हरवून जातो. अशाच काही कठीण प्रसंगांचा सामना करणाऱ्या पीडित व गरजू कुटुंबांच्या दुःखात सहभागी होत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी, भाजयुमो जिल्हा गोंदियाचे महामंत्री तथा पंचायत समिती गोरेगावचे माजी सभापती इंजि. मनोज बोपचे यांच्या पुढाकारातून गोरेगाव तालुक्यात विशेष सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. पोळ्याच्या सणाचे औचित्य साधून तालुक्यातील बाधित कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ आणि प्रत्येकी ₹१०,००० ची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.

वृद्ध माय-माऊलींच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य:

सणाच्या काळात तालुक्यातील एकही घर आनंदापासून वंचित राहू नये, या उदात्त भावनेतून कलपाथरी परिसरातील वृद्ध माय-माऊलींना ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात आला. संकटाच्या काळात दिलेली आर्थिक मदत हा केवळ निधी नसून तो एक मानसिक आधार असतो, तर आनंदाचा शिधा हा “आम्ही तुमच्या पाठीशी आहोत” या आपुलकीच्या विश्वासाचे प्रतीक आहे, अशी भावना या प्रसंगी व्यक्त करण्यात आली.“आईच्या आशीर्वादाने… आनंदाचा शिधा! आपुलकी, विश्वास आणि दर्जेदार शिधा, आपल्या सुखी संसारासाठी आमची साथ कायम…” या ब्रीदवाक्याला जागत इंजि. मनोज बोपचे यांनी राबवलेला हा संवेदनशील आणि माणुसकी जपणारा उपक्रम सध्या संपूर्ण गोरेगाव तालुक्यात कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरत आहे.

  • वाघहल्ल्यातील पीडित कुटुंब: काही दिवसांपूर्वी गोरेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात वाघाच्या हल्ल्यात डिलनबाई संतोष खरखाटे यांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. इंजि. मनोज बोपचे यांनी या बाधित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि ₹१० हजारांची आर्थिक मदत व आनंदाचा शिधा देऊन धीर दिला.

  • वीज दुर्घटनेतील अपघातग्रस्तास मदत: नवाटोला येथील शेतात काम करताना विजेचा करंट लागून स्वर्गीय चंद्रकुमार यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या दुःखाश्रू पुसण्यासाठी बोपचे यांच्याकडून त्यांच्या कुटुंबीयांना ₹१० हजारांची आर्थिक मदत व अन्नधान्याचा संच सुपूर्द करण्यात आला.

  • रानडुकराच्या हल्ल्यातील बाधितास साहाय्य: कलपाथरी येथे रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेले राधेश्याम सेगो राऊत यांनादेखील वैद्यकीय व कौटुंबिक आधारासाठी ₹१० हजारांची मदत व आनंदाचा शिधा देण्यात आला.