24.5 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home क्रीडा राष्ट्र व राज्य संघात गोंदियाचे विद्यार्थी

राष्ट्र व राज्य संघात गोंदियाचे विद्यार्थी

0
33

गोंदिया ,दि.२८ :: के.के. इंगले कनिष्ठ महाविद्यालयाच्या वर्ग १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी शारदा देवेंद्र येडेची निवड शालेय क्रीडा अंतर्गत १९ वर्षे वयोगटातील राष्ट्रस्तरीय फुटबॉल महिला संघात करण्यात आली. यावर्षी राज्यस्तरीय फुटबॉल महिला संघात शारदा येडेने उस्मानाबाद येथील स्पर्धेत गोंदिया जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. तेथील उत्कृष्ट प्रदर्शनानंतर राष्ट्रस्तरीय स्पर्धेच्या निवड समितीच्या सदस्यांनी तिची निवड पुढील स्पर्धेसाठी राष्ट्रस्तरीय महिला संघात केली. त्याबाबत राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सचिव अमृत इंगले व सहसचिव अजय इंगले यांनी प्रोत्साहन रक्कम १00१ रूपये व पुष्पगुच्छ देवून तिचा सत्कार केला. तसेच वर्ग ११ वी वाणिज्यमधील विद्यार्थिनी परमजीतसिंग बघेलला राज्यस्तरीय सायकल पोलो स्पर्धेत प्रतिनिधित्व केल्याबद्दल संस्थेच्या पदाधिकार्‍यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय क्रीडा तथा युवा संचालनालय अंतर्गत सन २0१६-१७ मध्ये विभागस्तरीय सायकल पोलो स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन केल्यामुळे परमजीतसिंग बघेलची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली.शारदा व परमजीतने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, संस्थेचे पदाधिकारी, सर्व प्राध्यापक व क्रीडा प्रशिक्षण नीरज तिवारी यांना दिले

blank