25 C
Gondiā
Tuesday, September 15, 2026
Home राष्ट्रीय विदेश डॉ.वर्षा गंगणे उत्कृष्ट प्राध्यापक पुरस्काराने सन्मानित

डॉ.वर्षा गंगणे उत्कृष्ट प्राध्यापक पुरस्काराने सन्मानित

0
30

देवरी,दि.१५ –  शिक्षक दिनाच्या निमित्ताने गेल्या रविवारी (दि.१३) भंडारा येथे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे उत्कृष्ठ शिक्षक-प्राध्यापकांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, देवरी येथील प्रा. वर्षा गंगणे याचेसह चार जिल्ह्यातील शिक्षक-प्राध्यापक यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

हेमंत सेलेब्रेशन येथे आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार सुधाकर अडबाले हे होते. प्रमुख अतिथी म्हणून ऍड.अभिजित वंजारी, व्ही.यु.डायगव्हाणे, सौ.विद्या अडबाले, डॉ.बबनराव तायवाडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी देवरी येथील मनोहरभाई पटेल महाविद्यालयातील अर्थशास्त्राच्या प्रा. वर्षा गंगणे यांचा मान्यवरांचे हस्ते शाल,भेटवस्तू, स्मृतीचिन्ह, ग्रंथ इत्यादी देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. उल्लेखनीय म्हणजे कोणतेही आवेदन न मागवता जिल्हा प्रतिनिधींनी पात्र शिक्षकांची निवड केली. गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांची निवड संदीप मांढरे आणि श्री.राजेंद्र झाडे यांनी केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपापले समयोचित मनोगत व्यक्त केले.

 महाराष्ट्र गीताने सत्कार सोहळ्याची सुरुवात झाली. दवडीपार येथील टेंभुर्णे मॅडम यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.