25.1 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home Top News ब्राझीलच्या फुटबॉल खेळाडूंना घेऊन जाणारे विमान कोसळून २५ ठार

ब्राझीलच्या फुटबॉल खेळाडूंना घेऊन जाणारे विमान कोसळून २५ ठार

0
61

वृत्तसंस्था
मीडीलीन, दि. २९ – कोलंबियातील मीडीलीन शहरात एक प्रवासी विमान कोसळून झालेल्या अपघातात २५ जण ठार झाले आहेत. या विमानात क्रू सदस्यासह मिळून एकूण ८१ प्रवासी होते. ब्राझीलच्या एका क्लबमधील फुटबॉल खेळाडूही या विमानातून प्रवास करत होते. स्थानिक स्पर्धेसाठी हे ब्राझीलीयन फुटबॉलपटू कोलंबियाला जात होते.

वैमानिकाने विमान कोसळत असल्याचे लक्षात येताच प्रसंगावधान दाखवून मोठा स्फोट टाळण्यासाठी इंधन टाकीचा दरवाजा उघडला. त्यामुळे या भीषण दुर्घटनेतून काही जण बचावले. फुटबॉल संघातील तीन खेळाडू बचावले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.

शहरी भागात हे विमान कोसळले असते तर मोठी दुर्घटना घडली असती असे कोलंबियन अधिका-यांनी सांगितले. या अपघातातून काही जण बचावले असावेत असे मीडीलीनचे महापौर फेडरिको यांनी म्हटले आहे. या विमानामध्ये ब्राझीलच्या फुटबॉल क्लबमधील खेळाडूंचा समावेश आहे.

blank