24.4 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home Top News रेल्वेसमोर आल्याने तीन हत्तींचा मृत्यू

रेल्वेसमोर आल्याने तीन हत्तींचा मृत्यू

0
30

गुवाहाटी (आसाम) – वेगात असलेल्या रेल्वेच्या समोर आल्याने आज (शनिवार) पहाटे झालेल्या अपघातात तीन हत्ती मृत्युमुखी पडले आहेत. या अपघातामुळे या मार्गावरून जाणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.

मध्य आसाममधील नागाव जिल्ह्यात कामपूर जवळ ही घटना घडली. जंगलातील हत्ती रेल्वे रूळाजवळ आल्याने हा अपघात घडला. दोन हत्तींचा घटनास्थळीच मृत्यु झाला. तर अन्य एक हत्ती नंतर मरण पावला. घटनेनंतर स्थानिकांनी वनविभागाला कळविले. हत्तींच्या मृत्युमुळे संतप्त झालेल्या स्थानिकांनी वन्य प्राण्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात वनखाते अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. मृत हत्तींना घटनास्थळाजवळच पुरण्यात येत आहे.