24.4 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home महाराष्ट्र मुंबई-नागपूर महामार्ग: विधान परिषदेत गदारोळ

मुंबई-नागपूर महामार्ग: विधान परिषदेत गदारोळ

0
16

नागपूर – मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील रस्ते आणि मेगासिटीशेजारी राज्यातील बड्या आजी-माजी सनदी अधिकाऱ्यांनी खरेदी केलेल्या शेकडो हेक्टर जमीनप्रकरणातील आर्थिक स्त्रोतांची चौकशी केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले असतानाच याप्रकरणाचे तीव्र पडसाद आज (शनिवार) विधान परिषदेतही उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत जाधव, काँग्रेसचे नारायण राणे आणि संजय दत्त यांनी सरकारला घेरले असता विधान परिषदेत प्रचंड गदारोळ उडाला. आणि विरोधकांनी सभात्याग केला.