24.4 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home Top News रशियन लष्कराचे विमान 39 प्रवाशांसहित कोसळले

रशियन लष्कराचे विमान 39 प्रवाशांसहित कोसळले

0
20

मॉस्को(वृत्तसंस्था), दि. 19 – रशियन लष्कराचं 39 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं आहे. लष्कराचं Il-18 हे विमान सायबेरियात कोसळलं आहे. विमानात 32 लष्करी अधिकारी आणि सात क्रू मेम्बर्स प्रवास करत होते. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सर्व प्रवासी सुखरुप आहेत.

कोत्लसोवो विमानतळावरुन विमानाने उड्डाण केल्यानंतर 27 किमी अंतरावर तिसकी गावात विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाचे तीन तुकडे झाले असल्याची माहिती मिळाली आहे. अपघाताची माहिती मिळताच बचावकार्याला सुरुवात करण्यात आली आहे. विमानातील सर्व प्रवासी सुखरुप असल्याचं संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे. 16 प्रवासी जखमी झाले आहेत.