24 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home विदर्भ प्रफुल्ल पटेलांचे विकास व्हिजन पूर्ण करा!

प्रफुल्ल पटेलांचे विकास व्हिजन पूर्ण करा!

0
33

गोंदिया,दि.29 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे विकासाचे व्हिजन पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार अशोक (गप्पू) गुप्ता तथा गोंदिया शहरातील सर्व प्रभागातील उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन माजी आ. राजेंद्र जैन यांनी केले.

ते मामा चौकात प्रभाग-४ चे उमेदवार सतीश देशमुख व सविता नानू मुदलिया यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले, मागील दोन वर्षात नगर परिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी शहराची हालत खराब केली आहे. विपक्षात असताना मोठमोठ्या गोष्टी करणारे सत्तेच्या या दोन वर्षात गोंदिया रेल्वे स्थानकातून न कोणती रेल्वे गाडी चालविली, न कोणत्या गाडीचा थांबा दिला. केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेपासून शहरातील नागरिकांना काहीही लाभ मिळाला नाही. शहरातील रस्त्यांची स्थिती दोन तीन वर्षात दयनिय झाली आहे. खा. प्रफुल्ल पटेल नेहमी विकासाठी सकारात्मक राजकारण करतात. आम्ही कधीही विरोधासाठी विरोध न करता विकासाला प्राधान्य दिले आहे. शहराच्या विकासासाठी खा. पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी अध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक गुप्ता, नगरसेवक पदाचे उमेदवार सतीश देशमुख व सविता नानू मुदलियार यांनी उपस्थितांना संबोधित केले.

निवडणूक प्रचार कार्यालयाच्या शुभारंभप्रसंगी प्रामुख्याने नरेश माहेश्वरी, विनोद हरिणखेडे, शिव शर्मा, अशोक शहारे, झलक बिसेन, जयंत कछवाह, मनोहर ठाकूर, कुंदा दोनोडे, महेश करियार, गुड्डू बिसेन, प्रीतपाल होरा, साबीर पठान, नानू मुदलियार, शिवराज भेगंडारकर, राकेश तुरकर, प्रदीप ठवरे, लिंबाजी येडे, अहमद मिस्त्री, के.जी. शर्मा, के.आर. पटेल, विजय तोडकर, कटकवार, गेडाम, पिल्लेवार, वंजारी, वसंत सुहाने, श्रावण रामटेके, गणेश राजोडिया, दास अभियंता, मन्नू बिरिया, संजू यादव, नवनीत आगलावे, अनिल गायधने, नमा ब्रह्मा, सुरेश रामटेके, बाल्या केकत, अशोक नशीने, कैलाश वासनिक, महिपाल कामरकर, मारूती येटरे, चंदू मेश्राम, डी.एस. राव, लाल खान, सलामभाई, रफीकभाई, गोविंद नायडू, विनय, विक्टर पाल, अमर जोसेफ, किरण वर्मा, लता मानकर, कुसूम सोनी, राजू सोनी यासह मोठ्या संख्येने गणमान्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.