जलयुक्त शिवार अभियानाची ७७१ गावांत कामे रखडली

0
13

गोंदिया,दि.29 : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१९पर्यंत जिल्ह्यातील संपूर्ण गावे या अभियानात येऊ शकणार नाहीत. अभियानाच्या पहिल्या दोन टप्यात फक्त १७१ गावांची निवड करण्यात आली. आताही ७७१ गावे या योजनेत आली नाहीत. येणाऱ्या दोन वर्षात सर्वच गावात काम करायचे असल्यास शासनाला काम करण्याची गती वाढवावी लागेल.

जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्यात (सन २०१५-१६) मध्ये २५४३ कामांचे उद्दीट्ये ठेवण्यात आले होते. यातील २ हजार काम पुर्ण करण्यात आले. यावर्षी ९५ गावांची जनवड करण्यात आली आहे. ही सर्व गावे वॉटर न्यूट्रल झाल्यामुळे ४४४ कामांना जिल्हा कृषि विभागाने रद्द केले. दुसऱ्या टप्यात ७७ गावांची निवड करण्यात आली.

प्रस्तावित ३०५९ कामांपैकीे २६४० कामांना मंजूरी देण्यात आली.७३१ कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आला. यातील २५३ काम पुर्ण करण्यात आले आहेत.

२०१९ पर्यंत १८ हजार गावांचे लक्ष्य सन २०१५-१६ ते २०१८-१९ पर्यंत राज्यातील १८ हजार गावात जलयुक्त अभियानातून कामे करण्याचे उद्दीट्ये राज्य शासनाने ठेवले आहे. दिड वर्षापासून अभियानाला सुरूवात झाली परंतु आतापर्यंत एक चतुर्थ्यांश गावात मोठ्या त्रासाने काम सुरू झालेत. गोंदिया जिल्ह्यातील ५५१ ग्राम पंचायती अंतर्गत ९४२ गावे आहेत. अभियानांतर्गत आतापर्यंत फक्त १७१ गावांची निवड झाली आहे. येणाऱ्या दोन वर्षात कृषि विभागाला अधिकाधिक गावांची निवड करावी लागेल. जिल्ह्यातील बहुतांश गावाची भूजल पातळी २०० ते २५० फूटाखाली गेली आहे. तेथे सिंचनाची समस्या आहे. त्या गावांना प्राधान्य देण्याची गरज आहे.