26.1 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home Top News ‘एनएसजी’ची वेबसाइट हॅक

‘एनएसजी’ची वेबसाइट हॅक

0
29

नवी दिल्ली, दि. 1 – भारताची दहशतवादविरोधी सेनेची राष्ट्रीय सुरक्षा रक्षकां (एनएसजी)संदर्भात असलेली अधिकृत वेबसाइट काही अज्ञातांनी हॅक केली आहे. रविवारी ही वेबसाइट हॅक करण्यात आली असून, हॅकर्सने Alone Injector अशी स्वस्तःही ओळख सांगितली आहे. हॅकर्सनं या वेबसाइटवर मोदींसंदर्भात काही आक्षेपार्ह मजकूरही टाकला आहे. वेबसाइटच्या होमपेजवर नागरिकांना पोलीस मारहाण करत असल्याचे फोटोही अपलोड करण्यात आले आहेत. तसेच काश्मीरला स्वतंत्र करा, असा मजकूरही टाकण्यात आला आहे