26.1 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ १४ जानेवारीला भिलाई येथे पवार समाज वार्षिकोत्सवाचे आयोजन

१४ जानेवारीला भिलाई येथे पवार समाज वार्षिकोत्सवाचे आयोजन

0
28

गोंदिया: पवार क्षत्रीय संघ भिलाई-दुर्गच्यावतीने येत्या १४ जानेवारी रोजी राजाभोज जयंती व वार्षिक स्नेह सम्मेलनाचे आङ्मोजन राजाभोज मंगल भवन दिक्षीत कॉलनी नेहरु नगर भिलाई येथे करण्यात आले आहे.या कार्यक्रमाची सुरुवात दुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार ता्मरध्वज शाहू यांच्या हस्तेत आमदार अरुण होरा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.यावेळी महापौर देवेंद्र यादव, माजी आमदार भजनसिह निरंकारी, कुसाभाऊ ठाकरे पत्रकारिता विद्यापीठाचे कुलपती मानसिंह परमार, डॉ. दिनेश बिसेन, डॉ. श्रीमती किरण बिसेन, पोलिस अधीक्षक लखन पटले, डॉ. ज्ञानेश्वर टेंभरे, टी.डी. बिसेन, गुलाबचंद्र बोपचे, एम.आर. देशमुख, मोसम हरिणखेडे, डॉ. एन.डी. राऊत, एच.के. बिसेन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर समारोप समारंभाला खासदार बोधसिंह भगत, माजी खासदार सरोज पांडे, माजी खासदार व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजकीय समन्वयक डॉ. खुशाल बोपचे, आमदार विद्यातरन भसीन, महापौर चंद्रीका चंद्राकार,गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे,मार्गदर्शक खेमेंद्र कटरे आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती अध्यक्ष लेखसिंह राणा, नंदलाल चौधरी, नामदेव बारंगे, डिलेश बोपचे,राधेश्ङ्माम देशमुख आदिनी दिली आहे.