गोपाल सेलोकर :ओबीसींनी संविधानिक अधिकारासाठी सज्ज व्हावे

0
12

भंडारा,दि.02 : गाडगे महाराज व पेरीयार रामास्वामी नायकर यांच्या स्मृती दिनाचा कार्यक्रम व कार्यकर्त्याची सभा घेण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष भैय्या लांबट होते. प्रमुख अतिथी अर्जुन सुर्यवंशी, गोपाल सेलोकर, वृंदा गायधने होते.
गोपाल सेलोकर अध्यक्ष ओबीसी सेवा संघ यांनी मार्गदर्शन करताना म्हटल की, गाडगे महाराज व पेरीआर रामास्वामी नायकर यांची प्रेरणा घेवून ओबीसीचे संविधानिक हक्क व अधिकारासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे. ओबीसी बांधवाना आपले हक्क व अधिकार कोणते आहेत याची जाणिव करून घ्यावी. भैय्याजी लांबट यांनी सुद्धा मार्गदर्शन करतानी म्हटल की संत व महापुरूषांची प्रेरणा घेवून जाती पातीत न राहता ओबीसींना एकत्र आणण्याचे काम करावे. ओबीसी सेवा संघ सामाजिक विचारपीठ असल्यामुळे समाज बांधवानी ओबीसी सेवा संघाला मजबूत करावे. संचालन वहिद शेख यांनी तर आभार वृंदा गायधने यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शंबू बांडेबुचे, अमर ईश्वरकर, सुधाकर मोथरकर, डॉ. महाजन, यशवंत फुंडे, हजारे, डॉ. बुराडे, तुळशीराम बोंदरे, मंजूषा बुरडे, पुष्पा सारखे, दयाराम आकरे, गोपाल देशमुख, रमेश शहारे, ईश्वर निकुडे यांनी प्रयत्न केले.