25.7 C
Gondiā
Friday, July 17, 2026
Home महाराष्ट्र महापालिका निवडणूक संग्राम 21 फेब्रुवारीला

महापालिका निवडणूक संग्राम 21 फेब्रुवारीला

0
26

मुंबई, दि. 11 – संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मुंबईसह 10 महापालिकांच्या आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे मतदान दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान 16 फेब्रुवारीला, तर दुस-या टप्प्याचं मतदान 21 फेब्रुवारीला होणार आहे. पहिल्या टप्प्यात 15 जिल्हा परिषदा आणि 165 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर दुस-या टप्प्यात 10 जिल्हा परिषद आणि 118 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे.

राज्यातील 10 महापालिकेच्या निवडणुकांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार असून, 23 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. या सर्व निवडणुकांची मतमोजणी 23 फेब्रुवारीला होणार आहे. पहिल्या टप्प्यात हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, यवतमाळ, औरंगाबाद, जालना, परभणी, वर्धा, जळगाव, चंद्रपूर, गडचिरोली जिल्हा परिषदांसाठी मतदान होणार आहे. तर दुस-या टप्प्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, अकोला, सोलापूर, अमरावती, उल्हासनगर जिल्हा परिषदांसाठी मतदान होणार आहे.

दरम्यान, 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारीपर्यंत महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. आजपासून आचारसंहिता लागू झाली असून, निवडणुकांसाठी 19 फेब्रुवारीला संध्याकाळी 5.30 वाजल्यानंतर प्रचार करता येणार नाही. तसेच न्यायालयाच्या स्थगितीमुळे नागपूर महापालिकेचा निवडणूक कार्यक्रमात समावेश करण्यात आला नाही.