लालूंनी केला पेन्शनसाठी अर्ज, मिळणार प्रतिमहिना 10 हजार

0
6

पटना, दि. 11 -बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी जयप्रकाश सेनानी सन्मान योजनेंतर्गत पेन्शनसाठी अर्ज केला आहे. अर्जाची पडताळणी करून त्यांचा अर्ज बिहारच्या गृह विभागाकडे पाठवण्यात आला आहे.
जेपी सेनानी सन्मान योजनेंतर्गत लालू प्रसाद यादव यांना 10 हजार रूपये पेन्शन मिळणार आहे. पेन्शनच्या रकमेच्या दोन श्रेणी आहेत. जेपी आंदोलनादरम्यान सहा महिन्यापेक्षा कमी काळ तुरूंगवास भोगलेल्यांना 5 हजार रूपये पेन्शन तर आंदोलनादरम्यान सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ तुरूंगवास भोगलेल्यांना 10 हजार रूपये पेन्शन प्रतिमहिना मिळणार आहे. लालू यादव हे दुस-या श्रेणीत येतात.लालू यादव यांना जून 2009 पासूनची पेन्शनची रक्कम मिळणार आहे. जयप्रकाश सेनानी सन्मान योजनेंतर्गत जवळपास 2 हजार 500 व्यक्ती पेन्शनचा लाभ घेत आहेत.