विद्यार्थ्यांसह सेल्फी हजेरी निर्णयाला स्थगिती – विनोद तावडे

0
21

मुंबई, दि. ११ – शाळाबाह्य मुलांच्या उपस्थितीसाठी दर सोमवारी शिक्षकांनी विद्यार्थी सोबत सेल्फी काढून पाठवण्याच्या निर्णयाला शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी स्थगिती दिली आहे. जानेवारीच्या पहिल्या सोमवारपासून शाळांमध्ये हा निर्णय लागू करण्यात आला होता. मात्र याला शिक्षक आणि मुख्याध्यापकांकडून विरोध झाला होता. मंगळवारी शिक्षक परिषदेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘सेल्फी नको’ या संदर्भात भेट घेतली होती. त्यानंतर बुधवारी सेल्फीबद्दलच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.

शाळांमध्ये विद्यार्थी-शिक्षक उपस्थितीची काटेकोर अंमलबजावणीसाठी वर्गशिक्षकांना विद्यार्थ्यांसह ९ जानेवारीनंतर येणाऱ्या पाच सोमवारी सेल्फी काढण्याचे फर्मान शिक्षण विभागाने काढले. या करिता केंद्रस्तरावर प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षकांची कार्यशाळा केंद्रप्रमुखांच्या उपस्थितीत घेतली गेली. मात्र शासनाच्या या धोरणाची सर्वच पातळीवर खिल्ली उडविली गेली. विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि एकूणच समाजाला दुष्परिणाम भोगावे लागतील अशी संतप्त प्रतिक्रियाही उमटली