29.7 C
Gondiā
Wednesday, July 15, 2026
Home राजकीय नवज्योतसिंग सिद्धू काँग्रेसमध्ये दाखल

नवज्योतसिंग सिद्धू काँग्रेसमध्ये दाखल

0
25

नवी दिल्ली- भारताचे माजी क्रिकेटपटू आणि माजी खासदार नवज्योतसिंग सिद्धू यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यानंतर सिद्धू आगामी पंजाब विधानसभेची निवडणूक लढणार असल्याची शक्यता आहे.
भाजपाचे स्टार प्रचारक असलेल्या सिद्धू यांनी २०१४ साली अरुण जेटली यांच्यासाठी लोकसभेची उमेदवारी सोडली होती. मात्र नंतर त्यांचे भाजपाने कुठेही पुनर्वसन न केल्याने नाराज असलेल्या सिद्धू यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती.
यानंतर ते आम आदमी पक्षात जाणार असल्याची चर्चा होती, तर सिद्धूंनी त्याचे खंडन केले होते. आता निवडणुकीच्या तोंडावर सिद्धू यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून त्यांचे तिकीटही निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. रविवारी सकाळी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये त्यांनी अधिकृतपणे प्रवेश केला, यावेळी काँग्रेसचे पंजाब प्रदेशाध्यक्ष कॅप्टन अमरिंदर सिंह हेदेखील उपस्थित होते.