30.6 C
Gondiā
Friday, July 10, 2026
Home विदर्भ नगराध्यक्षासमक्ष भाजप कार्यकर्त्यांची तलवारबाजी

नगराध्यक्षासमक्ष भाजप कार्यकर्त्यांची तलवारबाजी

0
20

आर्वी,दि.21 : आधी भाजपा कार्यकर्त्यांचे अतिक्रमण काढा, नंतर आमचे अतिक्रमण असेल तर ते काढतो, अशी मागणी करणाऱ्या नागरिकावर भाजपा कार्यकर्त्याने तलवारीने हल्ला केला. यात सदर युवक जखमी झाला. हा थरार जनतानगर येथे शुक्रवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास न.प. अध्यक्षांच्या समोरच घडला. वसंता ढोरे व पप्पू उर्फ धर्मराज ढोरे, अशी तलवारबाज भाजप कार्यकर्त्यांची तर सचिन पारधी, असे जखमी युवकाचे नाव आहे.

नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे हे शुक्रवारी सकाळी ७ वाजता नेहमीप्रमाणे शहरात फेरफटका मारत होते. जनतानगर येथे पोहोचले असता फरहाना बेगम यांच्या घरासमोर अतिक्रमण काढण्यावरून वाद सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे नगराध्यक्षांनी तेथे थांबून फरहाना बेगम तसेच कार्यकर्ते ढोरे यांना समजाविण्याचा प्रयत्न केला; पण तो निष्फळ ठरला.या प्रकरणी सहायक फौजदार अभिमान भुरे यांनी सचिन पारधी यांच्या बयाणावरून वसंत व धर्मराज ढोरे यांच्याविरूद्ध भादंविच्या कलम ३०७, ३४ व आर्म अ‍ॅक्टच्या कलम ४, २५ अन्वये गुन्हा दाखल केला. यातील धर्मराज ढोरे याला अटक करण्यात आली आहे. पूढील तपास ठाणेदार अशोक चौधरी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.