मुंबई-हैदराबाद लक्झरी बसला भीषण अपघात, ४ ठार

0
11

पुणे, दि. २१ – मुंबईहून हैदराबादला जाणा-या लक्झरी बसला पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूरजवळ भीषण अपघात झाला आहे. या दुर्दैवी घटनेत ४ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाले आहेत, त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. आज पहाटे पाचच्या सुमारास इंदापूरजवळ हा अपघात झाल्याचे समजते. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.