26.8 C
Gondiā
Tuesday, July 7, 2026
Home Featured News विनोद अग्रवालांच्या भजन संध्येत भक्त तल्लीन

विनोद अग्रवालांच्या भजन संध्येत भक्त तल्लीन

0
26

गोंदिया,दि.24-मनोहरभाई पटेल अकादमीच्या वतीने सातत्याने विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. नमाद महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात प्रसिद्ध भजन सम्राट विनोद अग्रवाल यांच्या भजन संध्येचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो भाविक भजनात तल्लीन झाले.
भजन संध्येचे उद््घाटन विनोद अग्रवाल, मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल, माजी आमदार राजेंद्र जैन, नरेश माहेश्‍वरी,शीला धोटे, निखील जैन, शिव शर्मा, कमलेश खोखरे आदींच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. दरम्यान, वर्षा पटेल यांनी उपस्थितांना नववर्ष आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक मनोहरभाई पटेल अकादमीचे सचिव राजेंद्र जैन यांनी केले. विनोद अग्रवाल म्हणाले, भजनामुळे भक्तीची प्राप्ती होते आणि भक्तीमुळे भगवंत मिळतात. संकीर्तन दिव्य चेतना प्राप्तीचे एकमेव साधन आहे.
हे साधन आनंद मिळवून देत असून जीवन जगण्याचा मार्ग दाखवितो. दरम्यान विनोद अग्रवाल यांनी ‘आजा रे कन्हाई तेरी याद आयी’, ‘मेरी लगी शाम संग प्रित दुनिया क्या जाने’, ‘राधिका गोरी से’ असे अनेक भजन सादर केले. त्यांचे सहयोगी बलदेव आणि बावरा यांनी देखील भजन सादर केले. संचालन संजय जनगे यांनी केले. आभार निखील जैन यांनी मानले.