नागपुर: हृदयविकार आणि उच्च रक्तदाब या भारतासमोरील सर्वात गंभीर सार्वजनिक आरोग्यविषयक समस्यांपैकी आहेत. राष्ट्रीय कुटुंबकल्याण सर्वेक्षण-५ (२०२१)नुसार, भारतातील जवळपास प्रत्येक पाचपैकी एक प्रौढ व्यक्ती (म्हणजे लोकसंख्येच्या २१.३ टक्के) उच्च रक्तदाबाने त्रस्त आहे. ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये हे प्रमाण जवळपास ४८ टक्क्यांपर्यंत पोहोचते. त्यामुळे उच्च रक्तदाबाचे लवकर निदान होणे आणि प्रतिबंधात्मक उपाय योजणे हे भारतात खूपच गरजेचे आहे. उच्च रक्तदाबाला अनेकदा ‘सायलेंट’ आजार म्हटले जाते. कारण सुरुवातीला त्याची कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र तो हृदयावर आणि रक्तवाहिन्यांवर परिणाम करीत राहतो. या वाढत्या समस्येमागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे सोडियमचे जास्त प्रमाणात होणारे सेवन. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरात दरवर्षी सुमारे १८.९ लाख मृत्यू हे सोडियमच्या जास्त सेवनाशी संबंधित असतात. यावरून या समस्येची तीव्रता लक्षात येते. भारतात स्वयंपाकात मिठाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याचबरोबर प्रक्रिया केलेल्या (प्रोसेस्ड) अन्नपदार्थांचे सेवनही वाढत आहे. त्यामुळे अनेकजण नकळतपणे शिफारस केलेल्या प्रमाणापेक्षा खूप जास्त सोडियमचे सेवन करतात. सोडियमचे जास्त प्रमाणात सेवन हे उच्च रक्तदाबाचे एक प्रमुख कारण आहे. प्रौढ व्यक्तीने दररोज ५ ग्रॅमपेक्षा कमी मीठ (सुमारे २,००० मिलिग्रॅम सोडियम) सेवन करावे, अशी शिफारस जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. मात्र, विविध अहवालांनुसार भारतात दररोजचे मिठाचे सरासरी सेवन ८ ते ११ ग्रॅम इतके आहे. अलीकडील काही अंदाजांनुसार, हे प्रमाण ११ ग्रॅमच्या जवळपास असून, ते शिफारस केलेल्या मर्यादेच्या दुपटीहून अधिक आहे. समस्या केवळ जास्त मीठ खाण्याची नाही. आपल्या खाण्याच्या चवीमध्ये मिठाचा वापर इतका रुजलेला आहे की, मीठ कमी केल्यास पदार्थांची चव कमी झाल्याची भावना अनेकांना होते. त्यामुळे मिठाचे प्रमाण कमी करणे अनेकांसाठी कठीण ठरते. सोडियमचे सेवन कमी करणे हे चांगले आरोग्य राखण्यासाठी महत्त्वाचे आहे. सोडियमचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने उच्च रक्तदाबाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे हृदयविकाराचा धोकाही वाढण्याची शक्यता असते. ‘टाटा सॉल्ट लाइट’ सारख्या उत्पादनांमध्ये सामान्य मिठाच्या तुलनेत १५ टक्के कमी सोडियम असते. त्यामुळे अन्नाची चव कायम राहते आणि सोडियमचे दैनंदिन सेवनही कमी होते. जागतिक आरोग्य संघटनेसारख्या जागतिक संस्थाही कमी सोडियम असलेल्या मिठाच्या वापराची शिफारस करतात. त्यांच्या मते, सोडियमचे सेवन कमी केल्यास रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. विशेषतः ज्या लोकांच्या आहारात सोडियमचे प्रमाण जास्त असते, त्यांच्यासाठी हृदयविकाराचा धोका कमी करण्यासही त्याचा फायदा होऊ शकतो. ‘एम्स’सारख्या संस्थांमधील तज्ज्ञांनीही, योग्य पद्धतीने वापर केल्यास कमी सोडियम असलेले मीठ हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते, असे सांगितले आहे. अर्थात, मूत्रपिंडाचे आजार असलेले किंवा काही विशिष्ट औषधे घेत असलेले रुग्ण यांनी आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. भारतात वाढत्या सोडियम सेवनाच्या समस्येवर उपाय करण्यासाठी आहारात मोठे किंवा कठोर बदल करण्याची गरज नाही. त्याऐवजी काही छोटे पण सातत्याने पाळलेले बदलही उपयुक्त ठरू शकतात, उदाहरणार्थ, ‘टाटा सॉल्ट लाइट’ सारखे कमी सोडियम असलेले मीठ वापरणे, जास्त मीठ असलेल्या प्रक्रिया केलेल्या (प्रोसेस्ड) अन्नपदार्थांचे सेवन कमी करणे आणि अन्नातील लपलेल्या सोडियमच्या स्रोतांकडे लक्ष देणे. सोडियमविषयी योग्य माहिती जाणून घेणे आणि विचारपूर्वक अन्नपदार्थांची निवड करणे यामुळे संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे अधिक सोपे होते. तसेच एकूण आरोग्य चांगले राखण्यासही मदत होऊ शकते. कमी सोडियम असलेले मीठ का निवडावे? • कमी सोडियम असलेले मीठ वापरण्यासारखे छोटे बदल दीर्घकाळासाठी निरोगी आहाराच्या सवयी अंगीकारण्यास मदत करू शकतात. • संतुलित आहाराचा भाग म्हणून दैनंदिन सोडियमचे सेवन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. • निरोगी जीवनशैलीमध्ये हे मीठ वापरल्यास रक्तदाब सामान्य पातळीवर राखण्यास मदत होऊ शकते. • रोजच्या जेवणात मिठाचा वापर अधिक जाणीवपूर्वक करण्याची सवय लागते. • घरच्या जेवणाची नेहमीची चव कायम राहते. केवळ मीठ बदलणे पुरेसे नाही. त्यासोबतच ताज्या अन्नपदार्थांची निवड करणे, प्रक्रिया केलेल्या (प्रोसेस्ड) अन्नपदार्थांचे सेवन मर्यादित ठेवणे आणि चव वाढवण्यासाठी मिठाऐवजी विविध औषधी वनस्पती व मसाल्यांचा वापर करणे अशा साध्या सवयीही संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैलीसाठी उपयुक्त ठरू शकतात. सोडियमचे जास्त प्रमाणात सेवन होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. मात्र, रोजच्या आहारात विचारपूर्वक अन्नपदार्थांची निवड केल्यास कालांतराने आहाराच्या सवयी अधिक चांगल्या होण्यास मदत होते. आज घेतलेले योग्य निर्णय भविष्यात चांगले आरोग्य आणि निरोगी जीवनशैलीसाठी उपयुक्त ठरू शकतात(Advt text)





